Visit Our Website
Today's Special

२९ सप्टेंबर – आज जागतिक हृदय दिन

२९ सप्टेंबर २०१८ दिनविशेष

वार : शनिवार 

शके : १९४०

सुर्योदय : ०६.२९

सुर्यास्त : १८.२९

नक्षत्र : कृतिका

तिथी : कृ. चतुर्थी

२९ सप्टेंबर दिनविशेष

आज जागतिक हृदय दिन

हृदयविकार आणि स्ट्रोक हे मानवी मृत्यूसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारे आजार आहेत आणि या आजारांमुळे दरवर्षी १७.३ दशलक्ष व्यक्ती मृत्यू पावतात. इतकेच नाही तर, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच परिस्थितीविषयी जागतिक पातळीवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने २००० या वर्षापासून जागतिक हृदय दिन साजरा केला जातो आहे. जागतिक हृदय दिन हा दिवस दरवर्षी (वर्ल्ड हार्ट फेडरेशनतर्फे) २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

२९ सप्टेंबर – इतर दिनविशेष

२००८ : ’लेहमन ब्रदर्स’ आणि ’वॉशिंग्टन म्युच्युअल’ या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा ’डाऊ जोन्स’ निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.
१९९१ : हैतीमधे लष्करी उठाव
१९६३ : ’बिर्ला तारांगण’ हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.
१९४१ : दुसरे महायुद्ध – किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
१९१७ : मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची (IES) पहिली शाळा ’किंग जॉर्ज हायस्कुल’ सुरू झाली.
१९१६ : जॉन डी. रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला.
अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्य
मोहिनी भारद्वाज – अमेरिकन कसरतपटू (Gymnast)
१९५७ : ख्रिस ब्रॉड – इंग्लिश क्रिकेटपटू व पंच
१९४३ : लेक वॉलेसा – नोबेल पारितोषिक विजेते पोलंडचे राष्ट्राध्यक्ष
१९३४ : लान्स गिब्ज – वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज
१९३२ : हमीद दलवाई – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू (मृत्यू: ३ मे १९७७)
१९३२ : महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: २३ जुलै २००४)
१९२८ : ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)
१९२५ : डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)
१९०१ : एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९५४)
१८९० : ल. गो. तथा नानाशास्त्री दाते – पंचांगकर्ते (मृत्यू: ? ? ????)
१९९१ : उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)
१९१३ : रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (जन्म: १८ मार्च १८५८)
१८३३ : फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा (जन्म: १४ आक्टोबर १७८४)
८५५ : लोथार (पहिला) – रोमन सम्राट (जन्म: ?? ???? ७९५)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close