Visit Our Website
Today's Special

२ ऑक्टोबर- आज महात्मा गांधींची जयंती

लालबहादूर शास्त्रींची आज जयंती.

२ ऑक्टोबर २०१८ दिनविशेष

वार : मंगळवार(अष्टमी श्राध्द)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.२९

सुर्यास्त : १८.२७

नक्षत्र : आर्द्रा

तिथी : कृ. अष्टमी

२ अॉक्टोबर दिनविशेष

आज महात्मा गांधींची जयंती.

मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ – जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. 

लालबहादूर शास्त्रींची आज जयंती

लालबहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ – ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. 
२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले. 

सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.

२ ऑक्टोबर – इतर दिनविशेष

२००६ : निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
१९६९ : महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
१९६७ : थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.
१९५८ : गिनीला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५५ : पेरांबूर येथे ’इन्टिग्रल कोच फॅक्टरी’ सुरू झाली
१९२५ : जॉन लोगी बेअर्ड याने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९०९ : रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.

१९७१ : कौशल इनामदार – संगीतकार व गायक
१९६८ : याना नोव्होत्‍ना – झेक लॉन टेनिस खेळाडू
१९४८ : पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)
१९४२ : आशा पारेख – चित्रपट अभिनेत्री

१९२७ : पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)
१९०८ : गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)
१८९१ : विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री (१९६४) (मृत्यू: १३ जून १९६७) येथे क्लिक करा
१८४७ : पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)
९७१ : गझनीचा महमूद (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)

१९८५ : रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)
१९७५ : के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (जन्म: १५ जुलै १९०३)
१९२७ : स्वांते अर्‍हेनिअस – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)
१९०६ : राजा रविवर्मा – चित्रकार (जन्म: २९ एप्रिल १८४८)

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close