Visit Our Website
Today's Special

१२ आॅगस्ट – आंतरराष्ट्रीय युवा दिवस

१२ ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : रविवार (श्रावण मासारंभ )

शके : १९४०

सुर्योदय : ०६.१८

सुर्यास्त : १९.०८

नक्षत्र : मघा.
तिथी : शु. प्रतिपदा.

१२ ऑगस्ट दिनविशेष.

१२ ऑगस्ट – आज आंतरराष्ट्रीय युवा दिन

दर वर्षी १२ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने १७ डिसेंबर १९९९ रोजी युथ वर्ल्ड कॉन्फरन्स दरम्यान केलेल्या शिफारसी लक्षात घेता प्रत्येक वर्षी १२ ऑगस्ट ला युवा दिन साजरा करण्याचे घोषित केले गेले. २००० साली प्रथमच आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला गेला.  या दिवसाचा उद्देश युवावृत्त्यांच्या समस्या आणि मुद्द्यांवर सरकारचं लक्ष वेधून घेणं आहे.

१२ ऑगस्ट – इतर काही दिनविशेष.

२००५ : श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.
२००२ : १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
२००० : प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड
१९९८ : सचिन तेंडुलकर याला ‘राजीव गांधी खेल रत्नट‘ पुरस्कार जाहीर
१९९५ : जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.
१९८९ : कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ’जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.
१९८२ : परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्याा जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
१९८१ : आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.
१९७७ : श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.
१९६४ : वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.
१९५२ : मॉस्कोमधे १३ ज्यू विद्वानांची हत्या
१९५० : अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
१९४८ : लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
१९४२ : चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार, २ ठार १६ जखमी
१९२२ : राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या ’राजसंन्यास’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९२० : शिवराम महादेव परांजपे यांनी ’स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.
१८५१ : आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close