Visit Our Website
Happenings

आरक्षणासाठी गळफास घेतलेल्या तरूणाचा जीव शेजाऱ्यांनी वाचवला

घाटीत दाखल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज रवींद्र साहेबराव जाधव, वय २५ या कन्नड तालुक्यातील मुंडवाडी गावच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी रवींद्र यास घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या आरोग्यासाठी पुढील २४ तास महत्वाचे राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.

रवींद्र यांनी औरंगाबाद आणि पुण्यात पोलिस भरती प्रशिक्षण घेतले होते. मात्र नोकरी मिळत नव्हती. अशातच आज त्यांना मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी जायचे होते. पण त्यास घरच्यांचा विरोध होता. नैराश्यातून दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांनी घरात दोराच्या साह्याने फाशी लावून घेतली. त्यांचे पाय जमिनीला टेकले. ते तडफडत असतांना भाऊ राजू जाधव व रामेश्वर घनकर धावत आले. त्यांनी विळ्याने दोरी कापून त्यास कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना घाटीत पाठवले.

पुढचे २४ तास महत्वाचे
दरम्यान, रविंद्र यांचे सिटी स्कॅन करून आयसीयूमध्ये हलवण्यात आले. गळफास घेतल्याने मेंदूला रक्त पुरवठा थांबला होता. यामुळे पुढील २४ तास चिंतेचे असल्याचे घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भारत सोनवणे म्हणाले. त्यांच्यावर डॉ गजानन सुरवाडे, डॉ अनिल पुंगळे, डॉ विकास राठोड आदी डॉक्टरांची टीम रवींद्र वर उपचार करत आहे. संध्याकाळी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रवींद्र यांची भेट घेऊन डॉक्टरांना जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची विनंती केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close