Visit Our Website
Happenings

रस्त्यांवर कचरा फेकणा-यांकडून २०६५० रूपये दंड जप्त.

बुधवारी (दि.८) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्यावर कचरा फेकणारे नागरीक , व्यावसायिक यांच्या वर  झोन निहाय दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई शहर अभियंता पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या नियंत्रणाखाली झाेन क्र. २ अंतर्गत सहा नागरीकांवर १२०० रूपये दंड, झोन क्र. ३ अंतर्गत एका नागरीकाला १५० रूपये दंड, झोन क्र. ४ अंतर्गत आठ नागरीकांवर ११५० रूपये दंड, झोन क्र. ७ अंतर्गत सहा नागरीकांवर १३०० रूपये दंड, याप्रकारे २१ नागरीकांकडून ३८०० रूपये दंड आकारण्याता आला.

ही कारवाई झोन निहाय स्वच्छता निरीक्षक व जवान यांच्या मार्फत करण्यात आली. तसेच आज (दि. ९ ) रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत झोन क्र. १ अंतर्गत एक नागरीक १५० रूपये दंड, झोन क्र. ४ अंतर्गत दोन नागरीकांना ३०० रूपये दंड, झोन क्र. ७ अंतर्गत एका नागरीकाला १५० रूपये दंड, झोन क्र. ८ अंतर्गत सहा नागरीकांना ९०० रूपये दंड, झोन क्र. ९ अंतर्गत सोळा नागरीकांना ४४५० रूपये दंड, असे एकूण २६ नागरीक , व्यावसायिक व अस्थापनेवर कारवाई करून एकूण ५,९५० रूपये दंड आकारण्यात आला.

दि. ८ रोजी ६७ नागरीकांवर कारवाई करून एकूण १४७०० रूपये दंड आकारण्यात आला व दि. ९ रोजी एकूण २६ नागरीकांवर कारवाई करन एकूण ५९५० रूपये दंड आकारण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close