Features

शहरात आज फक्त याच दोस्तीची चर्चा 

जैस्वाल यांंनी देखील फेसबुकच्या माध्यमातून तणावाणी यांच्या चाळीस वर्षाच्या मैत्रीचे आभार

सत्तेसाठी काहीपण हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. महाराष्ट्रात सख्खे भाऊ देखील एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूकीत उभे राहीले आहेत. असे असतांना सुध्दा केवळ मैत्रीची जाण ठेवत बंडखोरी मागे घेणारा एक मित्र औरंगाबादेत पहायला मिळत आहे. दोघेही राजकारणात तेवढेच मात्तबर, मागच्या विधान सभेला एकाचवेळी दोन्ही मित्र उतरले आणि दोघेही पडले ही गोष्ट लक्षात ठेवून यावेळी एका मित्राने मोठे पण  घेत मघार घेतली. आज याच मैत्रीची चर्चा संपूर्ण शहरात आहे.

हे दोन मित्र म्हणजे मा. आमदार प्रदिप जैस्वाल व मा. आमदार किशनचंद तणवाणी. जैस्वाल यांना युती कडून तिकीट मिळाले. उध्दव ठाकरे यांनी त्यांची उमेदवारी जाहिर केली. शिवसेनेला जागा सुटल्यामुळे भाजपाकडून मागील पाच वर्षांपासून तयारी करत असलेले तनवाणी नाराज झाले आणि त्यांनी बंडाचा झेंडा उगारला. मात्र फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी जैस्वाल तणवाणींकडे गेले आणि अखेर नाराज झालेले तनवाणी शांत झाले व त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि सगळ्या नात्यांपेक्षा मैत्रीचं नातं किती मोठं असतं हे दाखवून दिलं. सोशल मिडीया फेसबुक व्हॉट्स अप यावर केवळ हीच चर्चा आहे. प्रदिप जैस्वाल यांंनी देखील फेसबुकच्या माध्यमातून तणावाणी यांच्या चाळीस वर्षाच्या मैत्रीचे आभार मानले आहेत.  या पोस्ट ला शहरातील हजारो युजर्सने लाईक केले आहे. तणवाणी यांच्या माघारीमुळे चौरंगी होणारी ही लढत आता तिरंगी होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि एमआयएम हे तीन पक्ष चर्चेत आहेत. याशिवाय पहिल्यांदाच विधानसभा निवडणूकीत उतरलेली  वंचित आघाडी देखील जनमत मिळवण्याच्या तयारीला लागली आहे.

Related Articles

Close