Visit Our Website
Features

औरंगाबादकरांनो, जड पाण्याची काळजी करू नका, मजबूत, चमकदार केसांसाठी दररोज तेल लावून केसं धुवा

-सेलिब्रीटी हेअर ड्रेसर जावेद हबीब यांच्या शहरवासीयांना टिप्स

तुम्हाला मजबूत केस हवे आहेत का? मग फक्त एकच करा. दररोज केसं धुवा. औरंगाबादचे पाणी जड आहे. तरी काळजी करू नका. पाच मिनीटे तेल लावा आणि शाम्पू लावून केसं धुवा. पाण्याचा जडपणा तेल कमी करून टाकेल, असा सल्ला बॉलीवूड सेलिब्रिटींचे हेअर ड्रेसर जावेद हबीब यांनी दिला.

देश-परदेशातील स्टार, राजकरणी आणि अन्य बड्या हस्तींचे हेअर ड्रेसर म्हणून काम करणारे जावेद हबीब यांच्या जावेद हबीब सलून अॅण्ड अकॅडमीची आज औरंगाबादेत सुरूवात झाली. यासाठी हबीब खास शहरात आले होते. त्यांच्यासोबत मिस इंडिया डॉलीवूड शेरॉन, अॅकडमीचे व्यवस्थापकीय संचालक सागर तोलवाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिया रॉय यांची उपस्थिती होती. यावेळी मनमोकळा संवाद साधतांना हबीब यांनी औरंगाबादकरांसाठी महत्वाच्या टिप्स दिल्या.

न चुकता केस धुवा
जावेद हबीब म्हणाले, केसांबाबत आपल्यात प्रचंड अज्ञान आहे. केसांना तेल लावणे, रात्रभर तेल लावून ठेवणे, मालीश करणे हे केसासाठी आवश्यक असल्याचे समजले जाते. पण ते साफ चूकीचे आहे. आपल्याकडे केसांबाबत प्रचंड अज्ञान आहे. रोज केसं धुतले जात नाहीत. मात्र, राेज केसं धुतलेच पाहिजेत. ते घाम, धुळीमुळे खराब होतात. महाराष्ट्रात तर घामाची समस्या मोठी आहे. यामुळे केसात गुंता होऊन ते झडतात. तुटतात. यामुळे रोज शाम्पू लावून केस धुवा. जड पाणी असले तरी ५ मिनीटे तेल लावा. मग केस धुवा. ते मोकळे होतील. चमकदार होतील. त्यांचे आयुष्य वाढेल.

मी केसांचा शास्त्रज्ञ
आपण केस कापण्याच्या व्यवसायात ज्ञान टाकले. लोकांना केसांचे विज्ञान समजावून सांगीतले. यामुळे मला लोकं केसांचा शास्त्रज्ञ म्हणतात. मी लोकांना मजबूत केसांसाठी ज्ञान देतो. केस धुण्यासाठी कोणताही शेम्पू वापरा. शाम्पूचे काम फक्त केस धुणे हे आहे. किंमत महत्वाची नाही. प्रत्येकाचे गुण एकसमान असतात.- जावेद हबीब, सेलिब्रीटी हेअर ड्रेसर

माझ्यासाठी तुम्हीच सेलिब्रीटी
मला सेलिब्रिटींचा हेअर ड्रेसर म्हणून ओळखले जाते. पण माझ्यासाठी खुर्चीवर बसलेला प्रत्येक जण सेलिब्रिटी असतो. मी त्यांच्या केसांच्या प्रेमात पडतो. माझी कात्री त्यांना सौंदर्य देते, असे हबीब यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close