Breaking NewsEssay WritersFeaturesIn ShortpoliticalToday's Special

भाजपच्या तुषार भोसलेंची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले… ‘व्यसनाधीनतेमुळे तोंड कापावे लागले’

त्या पक्षाच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी सुरू आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खानची बाजू लावून धरली आहे. यावरुन भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

या संदर्भात आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिक आरोप करत आहेत. यावरुन आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षाचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल ? वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है !’

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेमुळे सुरू झालेल्या या प्रकरणात आता राजकीय वळणावर पोहोचले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक रोज वेगवेगळे आरोप करत आहेत. तर त्याला भाजपच्या वतीनेही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, भोसले यांनी सरळ-सरळ शरद पवार यांच्यावरच टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Related Articles

Close