Breaking NewsFeaturespoliticalSpecial StoryToday's Special

शरद पवारांवर टीकेनंतर राष्ट्रवादीची तुषार भोसलेंना धमकी; ‘राष्ट्रवादी स्टाईलने लवरकच भेटू’

आपण लायकी पेक्षा जास्त बोलल्यावर काय होते याचे उत्तर राष्ट्रवादी युवा काँग्रेस देईल!

मुंबई : नवाब मलिक यांच्यावर टीका करताना भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यामध्ये त्यांनी व्यवसनाधीनतेमुळे राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागले त्या प्रक्षाच्या प्रवक्त्याकडून व्यसनमुक्तीची अपेक्षा नसल्याचे म्हटले होते. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी तुषार भोसले यांना थेट धमकी दिली आहे.

या संदर्भात सूरज चव्हाण यांनी आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आचार्य तुषार भोसले यांना हा इशारा दिला आहे. यामध्ये ते म्हणतात की, ‘तुषार भोसले पात्रता आणि लायकी नसताना पवार साहेबांवर बोलतात… आपला योग्य तो सन्मान आणि सत्कार राष्ट्रवादी स्टाईलने लवकरच भेटून करू.’

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर या आरोप युद्धाला सुरूवात झाली आहे. या प्रकरणात नवाब मलिक वारंवार आर्यन खानची बाजू घेत एनसीबी आणि भाजपवर टीका करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना तुषार भोसले यांनी जहरी टीका केली होती. त्यामुळे यावरुन चांगलाच वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Related Articles

Close