Breaking NewsHappeningspoliticalToday's Special
कोरोना लसीकरणाचा एकही डोस झालेला नसला तर आता शासकीय कार्यालयात प्रवेश बंद!
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांची माहिती
औरंगाबाद : जिल्ह्यातील नागरिकांना कोविड-19 साथरोगापासून संरक्षण मिळावे यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. म्हणून त्यादृष्टीने शासकीय कार्यालयात येणा-या सर्व अभ्यागतांनी किमान कोविड-19 लसचा पहिला डोस घेतलेला असावा, या बाबीला प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी कळवले आहे. 15 नोव्हेंबर 2021 नंतर, कोविड लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच शासकीय कार्यलयात प्राधान्याने प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 रोजी कोविड 19 लसीकरण माहिमेस सुरुवात झालेली आहे, या मोहिमेस नागरिकांनी सजगपणे प्रतिसाद देऊन शासकीय कार्यालयाला भेट देण्यापूर्वी कोविड-19 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच लसीकरण मोहीम गतिमान करणे, जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे 100 टक्के लसीकरण व्हावे, या माध्यमातून कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखणे हा या मागील प्रशासनाचा हेतू असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रबुद्ध महिला सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने धम्म ग्रंथाचे वाटप
- ठाकरे सरकारतर्फे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधनात भरघोस वाढ!
- वृक्ष संवर्धनासाठी टेकडी पर्यावरण ग्रुपला सर्वतोपरी मदत करणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
- वानखेडेंचा जातीचा दाखला दाखवत मलीक म्हणाले…घोटाळेबाजीला इथूनच सुरूवात झाली!
- या राज्याला गांजाड्याच आणि वसुली खोराचं राज्य म्हणून तुम्हीच प्रसिध्दी दिली, खाेतांचा राऊतांवर पलटवार