Breaking News

ठाकरे सरकारतर्फे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधनात भरघोस वाढ!

शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या मागणीला यश

औरंगाबाद : मागील एक- दोन वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक – प्राध्यापकांच्या वेतन वाढीसंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट धर्मनिरपेक्ष संघटनेच्या( MUST) मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून शिक्षकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे . मानधन वाढीचा शासन आदेश जाहीर केला असून असून १ ऑक्टोबरपासून या वेतनवाढीची अंमलबजावणी होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेने स्वागत केले आहे, शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे या संघटनेच्या प्रमुख सल्लागार असून गेली दोन वर्षे त्या सातत्याने या मागणीचा पाठपुरावा करीत असून त्यांच्या मागणीला यश आले आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली हि प्राध्यापकांची मागणी ठाकरे सरकारने मान्य केली असून आमच्या संघटनेच्या सल्लागार डॉ. मनीषा कायंदे यांच्या शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या मदतीने शासनाकडे गेली दोन वर्षे या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत अशी माहिती माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ .प्रा. विजय पवार यांनी दिली. यापूर्वी पदविस्तरावर काम करणाऱ्या कला, वाणिज्य विज्ञान शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील शिक्षकांना केवळ ३०० रुपये प्रतितास एवढे तुजपुंजे मानधन मिळत होते पुढे ते प्रतितास ५०० रुपये करण्यात आले मात्र नव्या आदेशानुसार ६२५ रुपये प्रतितास इतके मानधन मिळणार आहे . जवळपास २५% इतकी वेतनवाढ देण्यात आली आहे. तसेच शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील शिक्षकांना ७५० रुपये प्रतितास मानधन मिळणार असून प्रात्यक्षिकाच्या मानधनात देखील कला, वाणिज्य विज्ञान शाखेसाठी रुपये २५० तर विधी आणि शारीरिक शिक्षण शाखेसाठी रुपये ३०० प्रतितास इतकी वेतनवाढ करण्यात आली आहे .

MUST संघटनेने तासिका ऐवजी कॉन्ट्रॅक्ट सेवा द्यावी आणि त्यानुसार वेतन द्यावे अशी मागणी केली होती मात्र यात तांत्रिक अडचण असल्याने, शासनाने तासिका तत्वाचे मानधन २५% वाढवून दिले आहे.. गेली दोन वर्षे ‘मस्ट’संघटना शासनाकडे तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मागण्या संदर्भात आग्रही होती आज मात्र या शिक्षकांना काही प्रमाणात का होईना न्याय मिळाला आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ .प्रा. विजय पवार यांनी दिली असून उर्वरित मागण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करत राहू असे डॉ. प्रा. विजय पवारयांनी म्हटले आहे . संघटनेच्या या लढ्यात महासचिव डॉ. शांतज देशभ्रतार, उपाध्यक्ष डॉ. निलेंद्र लोखंडे, खजिनदार डॉ. निर्मला पवार यांनी भरीव योगदान दिले असून संघटनेच्या सर्व सदस्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Related Articles

Close