Visit Our Website
Today's Special

७ ऑगस्ट – रविंद्रनाथ टागोर यांचे आजच्या दिवशी निधन झाले होते.

७ अॉगस्ट २०१८  दिनविशेष.

वार : मंगळवार

शके १९४०

सुर्योदय : ०६.१७

सुर्यास्त : १९.११

नक्षत्र : रोहिणी

तिथी : कृ. दशमी

७ आॅगस्ट  दिनविशेष

१९४१: रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचे निधन. (जन्म: ७ मे १८६१)

रवींद्रनाथ टागोर ( बंगाली : रवींद्रनाथनाथ ठाकूर) ( ७ मे १८६१- ७ ऑगस्ट १९४१) यांना गुरुदेव असेही म्हटले जाते. जागतिक प्रसिद्ध कवी , साहित्यिक , तत्त्वज्ञ आणि भारतीय साहित्य यांचे ते एकमेव नोबेल विजेते आहेत. बंगाली साहित्य माध्यमातून, भारतीय सांस्कृतिक देहभान मध्ये एक नवीन जीवन एक युग आली. आशियातील ते पहिले नोबेल विजेते आहेत. ते एकमेव कवी आहेत ज्यांच्या दोन रचनांचे दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत बनले आहे – भारताचे राष्ट्रगीत आणि बांग्लादेशचे राष्ट्रगीताचे लेखक अमर सोनार बांगला हे गुरुदेव आहेत.

७ ऑगस्ट – इतर काही दिनविशेष.

१९४७: मुंबई महानगरपालिकेने बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली
१९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
१९८१: सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले
१९८५: जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोई, मोमोरू मोहरी आणि चीकी मुकाई यांची निवड केली गेली.
१९८७: अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले.
१९९०: गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.
१९९१: जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी झाली.
१९९७: चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
१९९८: अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
२०००: ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
१८७१: जलरंगचित्रकार, रविंद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५१)
१८७६: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९१७)
१९१२: हृदयरोगतज्ञ केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म.
१९२५: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म.
१९३६: दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म.
१९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांचा जन्म.
१९६६: विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांचा जन्म.
१९३४: जॅक्वार्ड लूम चे शोधक जोसेफ मॅरी जाकॉर्ड यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १७५२)
१८४८: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १७७९)
१९७४: भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close