Breaking NewsHappeningspoliticalToday's Special

आता इथे आल्यावर म्हणता… आम्ही निर्णय घेणार? खासदार इम्तियाज जलील यांची पालकमंत्र्यांवर टीका

औरंगाबाद : गेल्या आठ दिवसांपासून लेबर कॉलनीमधील नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. राज्य सरकारला औरंगाबादमध्ये काय सुरू आहे, हे माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीका केलीय. राज्य सरकारने ठरवले तर एका मिनिटांमध्ये निर्णय होईल, मात्र, राज्यातील महत्त्वाचे मंत्री इथे आल्यानंतर म्हणता की, मी सर्वांचे एकून घेतले आहे, आता आम्ही निर्णय घेणार आहोत. मग इथे येण्याच्या आधीच का निर्णय घेतला नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर सरकारी निवासस्थान रिकामे करुन घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची होती. आता 40 वर्षांनंतर तुम्हाला अचानक जाग येती, की या इमारती पडायला आल्या आहेत. असे चालणार नाही. या नागरिकांचा सहानभुतीपूर्वक विचार करायला हवा, असेही खासदार म्हणाले.

राज्य सरकारमध्ये बसलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी लेबर कॉलनीमध्ये येवून बसण्यापेक्षा सरकारकडे जावून बसावे. आणि या नागरिकांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडावे, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारने ठरवले तर एक मिनिटामध्ये यावर तोडगा काढता येणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.

 

Related Articles

Close