Breaking NewsHappeningspoliticalToday's Special
…आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला सिटी बसने प्रवास!
नाशिकच्या सावरकर नगर ते अशोकनगर दरम्यान सिटी प्रवसाचा घेतला आनंद

नाशिक : भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी सावरकर नगर ते अशोकनगर दरम्यान नाशिक सिटी बसने प्रवास केला. या वेळी त्यांनी नाशिक महानगर पालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सिटी बस सेवेचे कौतूक केले. आगामी काळात नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीची तयारी म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.
या संदर्भात पंकजा मुंडे यांनी नाशिक महानगर पालिकेच्या बस सेवेचे कौतूक करत सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ‘नाशिक शहरात महापालिकेने सुरू केलेल्या सिटी बस सेवेचा आज प्रत्यक्ष प्रवास करत लाभ घेतला. सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास मी केला. महापालिकेने सुमारे 250 बस यासाठी रस्त्यावर उतरवल्या आहेत.या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे.’
नाशिक शहरात महापालिकेने सुरू केलेल्या सिटी बस सेवेचा आज प्रत्यक्ष प्रवास करत लाभ घेतला. सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास मी केला. महापालिकेने सुमारे 250 बस यासाठी रस्त्यावर उतरवल्या आहेत.या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. pic.twitter.com/WXaZSMrwIK
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 2, 2021
नाशिक महानगर पालिकेमध्ये मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे यांचे नाशिक महानगर पालिकेकडे विशेष लक्ष आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांचे लक्ष नाशिक शहराकडे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या