Visit Our Website
Happenings

वाळूज एमआयडीसी तोडफोड प्रकरणातील चारशे संशयित दंगलखोरांच्या पोलीस शोधात.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी बंद पुकारला होता.  शहरात बंद शांततेत पार पडला. बंद दरम्यान वाळूज एमआयडीसीतील विविध कारखान्यांची तोडफोड आणि जाळपोळ काही दंगलखोरांनी केली.१०७ संशयित दंगलखोरांना एमआयडीसी वाळूज  पोलिसांनी अटक केली असून दंगलखोरांना चिथावणी देणाऱ्या बुलेटस्वार पप्पूसह  ४०० संशयित्यांच्या पोलीस अजून शोधात आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

यामधील अर्ध्याहून अधिक आरोपी कारागृहात आहेत, तर काही जणांना न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. जाळपोळ, दगडफेक आणि लुटालूट करणाऱ्या टोळक्यांना एका बुलेटस्वाराने चिथावणी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याचे नाव पप्पू असल्याचे पुढील तपासात समोर आले. परंतु घटनेपासून संशयित पप्पू गायब झालेला आहे. असे पोलीस निरीक्षक साबळे यांनी सांगितले. ही दंगल पूर्वनियोजित नव्हती, त्यामुळे याबाबतची कल्पना आधीच पोलिसांना कळू शकली नाही, असेही पो.नि. साबळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close