Visit Our Website
Happenings

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी वाळूज येथील तोडफोड झालेल्या कंपनींची केली पाहणी .

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी वाळुज येथे मराठा आरक्षण बंद दरम्यान तोडफोड झालेल्या कंपन्यांची पाहणी केली. पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून तोडफोड झालेल्या कंपनींचे पंचनामे सुरू आहेत दोन दिवसात ३६ संशयितांना अटक करण्यात आली असून सहा गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अशी माहिती वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनी दिली. ४९ कंपन्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खासदार चंद्रकांत खैरे, आ. प्रशांत बंब, आ. संजय शिरसाठ , आ. सतीश चव्हाण यांनी देखील वाळूज येथे झालेल्या तोडफोडीची पाहणी केली.

वाळूज एमआयडीसीत झालेली ७० कंपन्याची तोडफोड हा पूर्व नियोजनाचा प्रकार होता. कट रचून ही दंगल घडवण्यात आली. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत लावण्यात आलेल्या कलमात १२० ब हे कलम वाढवले आहे. तसे जवाबही नोंदवण्यात आल्याची माहीती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close