Happenings

आईने मुलाला मोबाईल खेळायला दिला नाही, मुलगा गेला घरातून निघून

मुलाने मोबाईल मागितल्यावर आईने मोबाईल खेळायला दिला नाही म्हणून एक अल्पवयीन मुलगा घरातून निघुन गेल्याचा प्रकार गारखेडा परिसरात घडला. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काबरानगर निवासी महिलेच्या मुलाने मोबाईल खेळण्यासाठी मागीतला होता. तो त्या महिलेने देण्यास नकार दिला. त्यामुळे १५ वर्षीय मुलगा घरातून निघुन गेला. त्याला कोणीतरी फुस लावून पळवून नेले असावे अशी फिर्याद महिलेने जवाहर नगर पोलिस ठाण्यात दिली. त्या महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढिल तपास पोलिस करत आहे.

Related Articles

Close