Features
लसीकरणाची एकही मात्रा न घेतलेले वेतनापासून राहणार वंचित
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आदेश
औरंगाबाद : जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा (Dose) घेणे बंधनकारक असल्याने, कमीत कमी एक मात्रा (Dose) घेतली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच, माहे नोव्हेंबर-2021 (Paid in माहे डिसेंबर-2021) या महिन्याचे वेतन देयक अदा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी कोषागार अधिकारी यांना दिले आहेत.
ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी, औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर करणे व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश लागू करण्यात आलेले आहेत.
तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 02 नोव्हेंबर, 2021 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये शासकीय अधिकारी / कर्मचारी, खाजगी आस्थापनेतील कर्मचारी, व्यावसायिक, फेरीवाले, रिक्षा / टॅक्सी चालक व इतर कामगार / कर्मचारी यांचे तात्काळ लसीकरण पूर्ण करुन घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.
पंतप्रधान यांनी दि.03/11/2021 च्या VC मध्ये औरंगाबाद मधील लसीकरण राज्य तसेच राष्ट्रीय साध्यापेक्षा कमी असल्याने चिंता व्यक्त करून,प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने ज्या अधिकारी / कर्मचारी यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा घेतलेली नाही, अशा अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये, तसेच अधिकारी/कर्मचारी यांचे सर्व प्रकारचे वैयक्तिक मागण्याबाबतचे देयके पारीत करण्यात येऊ नये.खाजगी व्यक्ती बाबतच्या इतर वयक्तिक देयाकासही उपरोक्त नमूद बाब अनिवार्य राहील. याबाबत आपले अधिनस्त सर्व उपकोषागार अधिकारी यांना सक्त निर्देश देण्यात यावे असे देखील आदेशात नमुद करण्यात आले आहे.