Features

डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या पाहिले पर्वाला रविवार पासून सुरुवात

१५ संघात होणार सामने

औरंगाबाद : जिल्ह्यातील डॉक्टरांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन रविवार दि. २८ पासून एन-२ च्या मैदानात करण्यात आले आहे. या स्पर्धेत १५ संघ सामील झाले असून ही स्पर्धा दि. २८ ते दि. ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तब्बल २५० डॉक्टरांचा स्पर्धे मध्ये समावेश असून विजेत्या संघाला बक्षीस रुपी ट्रॉफी देण्यात येणार असल्याची माहिती गणेश गजमल, योगेश्वर वालतुरे यांनी दिली.

कोरोना काळात सगळ्यात मोठी दारोमदार ही डॉक्टरांच्या खांद्यावर होती. मधला काळ तर फार खडतर गेला यात नागरिकांसह डॉक्टरांचेही प्राण गेले. त्यानंतर कोरोनाची तीव्रता कमी झाली. हे करण्यात डॉक्टरांनी फार मेहनत घेतली, याच सक्सेससाठी मनीट्रस्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चे गणेश गजमल व अमोल यशवंते, इंडोवेलिकस हेल्थ केअरचे योगेश्वर वालतुरे, गजानन हॉस्पिटल चे डॉ.दळवी आणि डॉ. वालतुरे हे परिश्रम घेत असून पाच ग्रुपमध्ये हे सामने रंगणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Related Articles

Close