Features

आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

औरंगाबाद : आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह (विभागीयस्तर) (क्षमता 1000) औरंगाबाद येथे सन 2021 -2022 करीता वर्ग 11 पासून ते पदवी, पदव्युत्तर पदवी, वैद्याकीय, अभियांत्रीकी व डिप्लोमा च्या वर्गाकरीता ऑनलाईन वसतिगृह अर्ज सुरु करण्यात आली आहे. सदर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट http://swayam.mahaonline.gov.in  अशी आहे. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना आहार, निर्वाह, स्टेशनरी, बेडींग साहित्य इत्यादी भत्ते डिबीटी द्वारे त्यांच्या आधार लिंक बॅक खात्यावर जमा होणार आहे. करिता अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह वसतिगृहाच्या कार्यालयाच्या कार्यालयात  30 नोव्हेंबर 2021 आहे. तरी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह वसतिगृहाच्या कार्यालयात  30 नोव्हेंबर 2021 पर्यत सादर करावे, असे आवाहन गृहप्रमुख व गृहपाल यांनी केले आहे.

            अर्ज सादर करण्याचा पत्ता – आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह (विभागीयस्तर(क्षमता 1000) चावडा कॉम्पलेक्स, आयप्पा मंदिर कमानीजवळ, बीड बायपास, सातारा परिसर, औरंगाबाद पिन कोड क्र. 431010.

            अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :- यु.एन. राऊत, गृहप्रमुख मो.न. 960496589,  एन.वाय.मोरे, गृहपाल, मो.न. 9822780500, जी.बी.दुबे, गृहपाल मो.न. 9579638469, आर.जे. कोतकर गृहपाल मो.न. 9595651472, एम.पी.चौधरी ,गृहपाल मो.न. 9552049156.

Related Articles

Close