Breaking News
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बस सेवा बंद.
आंदोलनाच्या पार्षवभूमीवर शहरातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी पूकारलेल्या बंद मुळे छावणी बाजार रस्त्यावरच थाटला.
मराठा समाजाने आरक्षणासाठी गुरुवारी बंद पुकारला होता. याचा परिणाम छावणी भागात सुद्धा दिसून आला. गुरुवारी छावणी मध्ये भाजी मंडई येथे बाजार भरत असतो. परंतु बंद मुळे गुरुवारी हा बाजार भाजीमंडई समोरील रस्त्यावरच भरला. ग्रामीण भागातून आलेल्या अनेक व्यापाऱ्यांचे ग्राहकांविना हाल झाले. बाहेरील राज्यातून विक्रीसाठी आणलेल्या गुरांना बंद मुळे ग्राहक मिळाले नाही. गुरांना तिथेच ठेवावे लागले.