Breaking NewspoliticalToday's Special

स्वच्छ सर्वेक्षणानुसार औरंगाबाद 22 व्या स्थानावर; शिवसेना करणार सफाई कामगारांचा सत्कार

प्रत्येक वार्डातील पदाधिकारी ३० नोव्हेंबरला करतील सत्कार

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान मिशन तर्फे दरवर्षी स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल तयार केला जातो. मागील वर्षी सन २०२० मध्ये या स्वच्छ सर्वेक्षण अहवालानुसार औरंगाबाद ८८ व्या स्थानावर होते. आता सन २०२१ मध्ये आपले शहर २२ व्या स्थानावर आहे. हे आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानास्पद कार्य असून यामध्ये मनपा सफाई कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. याची जाण ठेवून शिवसेनेच्यावतीने या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळवले आहे.

दिनांक 30 नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजता शहरातील प्रत्येक वार्डात या प्रभागातील वार्डाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे त्या भागात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांचा सत्कार करणार आहे. या सत्कार सोहळ्याप्रसंगी वार्डातील उपशहरप्रमुख, विभागप्रमुख , उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख ,सहगटप्रमुख ,शिवसेना महिला आघाडी चे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, जयवंत ओक, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, शिवसेना शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी, सुशील खेडकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहरसंघटक प्राजक्ता राजपूत, आशा दातार, विद्या अग्निहोत्री, युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, हनुमान शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Close