Visit Our Website
Breaking News

वाळूज येथील तोडफोड झालेल्या कंपनींची राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली पाहणी.

गुरूवारी झालेल्या आंदोलना दरम्यान वाळूज येथे जमावाकडून झालेल्या तोडफोडीची पाहणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज संध्याकाळी साडेसहा वाजता केली. नहार इंजिनिअरिंग, सिमेन्स व इंडुरन्स वाळूज औद्योगिक परिसरातील या कंपन्यांच्या एक तासाच्या या पहाणीदरम्यान मुंडे यांनी जमावाकडून कंपनीचे कश्या प्रकारे व किती नुकसान झाले याबाबत कंपनी व्यवस्थापना कडून माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार अतुल सावे,डॉ.भागवत कराड,शिरिष बोराळकर,पंचायत समिती सदस्य सतीश पाटील तसेच सीएमआयचे अध्यक्ष राम भोगले,जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया आदींची उपस्थिती होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close