Visit Our Website
Breaking News

वाळूज एमआयडीसीत झालेल्या तोडफोडी प्रकरणातील अटकसत्र -१७ हल्लेखोरांना केली अटक.

गुरूवारी मराठा आरक्षण बंद  दरम्यान वाळूज एमआयडीसीत झालेल्या तोडफोडी प्रकरणात १७ हल्लेखाेरांना अटक करण्यात आली अाहे. तसेच तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून शुक्रवार पासून हे अटक सत्र सुरू आहे. विविध कलमांतर्गत या घटनेत सहभागी असलेल्या हल्लेखोरांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

नुकसानीसंदर्भात उद्योजकांकडून रात्री उशिरापर्यंत ३५ तक्रारी देण्यात आल्या असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत निवृत्ती पवार, रवींद्र शेटे, बाळू पेंडगे, मदन गवळी, प्रभाकर साळुंके, सोपान बुरजे, सोमनाथ सुराशे, निकेश बाबर, सुदर्शन काळे, आनंद हुडेकर, मंगेश उदार, बळीराम गायकवाड, सूरज पा. जाधव, गजानन चोरमारे, रामेश्वर वानखेडे, संतोष डुकरे, अक्षय गायकवाड या १७ हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close