Visit Our Website
Breaking News

मराठा आरक्षणासाठी विजय नगर येथे आत्महत्या

विजयनगर येथील कारभारी शेळके (४३) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस  आली. घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेळके यांच्यावर श्रीराम फायनान्सचे २ लाखांचे कर्ज होते. त्यांनी आत्महत्येआधी चिठ्ठी लिहीली होती. मी मराठा समाजाचा असून मला सरकारचे काही फायदे मिळाले नाही. मी श्रीराम फायनान्सकडून दोन लाखाचे कर्ज काढले होते. ते मला जास्त परेशान करत होते. म्हणून मी आत्महत्या करत आहे. तसेच माझ्या मुलांना आरक्षण द्या अशी विनंती शेळके यांनी लिहीलेल्या चिठ्ठित केली. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी पुकारलेल्या बंद नंतर आज ही घटना घडल्याने विजयनगर येथे मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close