Breaking News
क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातील आंदोलक आणि शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांत बाचाबाची.
पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद मिटला.
शहरातील क्रांति चौकात आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावरून मराठा क्रांती मोर्चातील आंदोलक आणि शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांत बाचाबाची झाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी एका आंदोलकास मारहाण केल्याने वाद वाढला. संतापलेल्या मराठा आंदोलकांनी दानवेंसमोरच उद्धव ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच काही आंदोलकांनी दानवे यांच्या दिशेनी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्वरीत मध्यस्थी करून वाद मिटवला.