Uncategorized

“मुक्ती सोपान’मध्ये निनादला कानडा राजा पंढरीचा…

लॉयन्स क्लब ऑफ मेट्रोतर्फे आयोजन, लॉ.मथुरादास देशमुख यांचा वाढदिवस साजरा

समर्थनगरातील मुक्तीसोपान वृद्धाश्रमातील आजी आजोबा नुकतेच भक्तीरसात न्हाहून निघाले. कानडा राजा पंढरीचा या अजरामर अभंगाने साक्षात विठुराया त्यांच्यासमोर उभा राहिला. या आणि अशाच रचनांनी त्यांच्या दिवसाची सुरूवात आनंदाने झाली. नंंतर उपस्थितांची विचारपूस करत आजी आजोबा भूतकाळातील आठवणीत रमले. लज्जतदार जेवणाने दिवसाची रंगत वाढवली.

निमीत्त होते लाॅयन्य क्लब ऑफ मेट्रोचे सदस्य एमजेएफ  मथुरादास देशमुख यांच्या ६८ व्या वाढदिवसाचे. देशमुख दरवर्षी त्यांचा वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करतात. यंदा त्यांनी समर्थनगरातील मुक्तीसोपान न्यासातर्फे चालवले जाणाऱ्या वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा केला. स्वत: गायनाचा छंद जोपासणाऱ्या देशमुख यांनी कानडा राजा पंढरीचा हा अभंग सादर केला. आजी-आजोबांनी त्यास साथ दिली. नंतर सर्वांनी देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

गायनाच्या कार्यक्रमानंतर देशमुख कुटूंबियांतर्फे लॉयन्स क्लबच्या “फीड दि हंगर’ उपक्रमाअंतर्गत आश्रमातील सदस्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली. जेवणानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून दिला. मग बराच वेळ रंगलेल्या गप्पातून एकमेकांचे सुख-दु:ख जाणून घेतले. या प्रसंगी प्रायोजक लॉ.मथुरादास देशमुख, लॉ.अलका देशमुख, लॉ.मोरेश्वर कुलकर्णी, क्लबच्या अध्यक्ष लॉ.चारुलता कुलकर्णी, कोषाध्यक्ष लॉ. प्रमिला नवटके, लॉ.अंगद नवटके, लॉ.आनंद देसाई, लॉ.कल्पना देसाई आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Close