Special Story

लॉकडाऊनमध्ये केले व्हिडीओ कॉलवर उपचार, मुंबईच्या तरूणीचा कर्करोग १०० टक्के बरा

औरंगाबादच्या सत्यविष्णू हास्पीटलचे डॉ.पटेल यांनी केले आयुर्वेदिक उपचार, दीड वर्षात रूग्ण ठणठणीत, डॉक्टरांचे मानले आभार

गेल्या वर्षी मुंबईतील एका तरूणीला अंडाशयाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. मात्र, उपचार सुरू करण्याआधीच लॉकडाऊन लागला व अडथळे निर्माण झाले. कुटूंबियांना औरंगाबादच्या सत्यविष्णु हाॅस्पीटलचे संचालक डॉ.आय.जी.पटेल आयुर्वेदाने कॅन्सरवर उपचार करत असल्याची माहिती मिळाली. डॉ.पटेल यांनी दिड वर्षे व्हिडीओ कॉलवर संवाद साधत उपचार केले आणि तरूणी ठणठणीत झाली. आजवर केवळ व्हिडीओवर भेटणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी ती कुटूंबियांसह शहरात आली होती. आयुर्वेदाने नवीन आयुष्य दिल्याचे सांगतांना तिचे डोळे पानावले.

स्वप्नाली देवरे ही घाटकोपरची राहणारी. २३ वर्षाची अविवाहीत स्वप्नाली एका खाजगी कंपनीत नोेकरी करते. २०१९ च्या मध्यात मध्ये तिला ओटी पोटात दुखणे, पोटदुखी, मासिक पाळीसारखा रक्तस्त्राव, पोट सुमारणे व त्यात पाणी होणे, श्वास घेण्यास त्रास, पाठदुखी, भूक न लागणे, वजन कमी होणे आणि अशक्तपणा जाणवू लागला. स्थानिक दवाखान्यात दाखवून फरक न पडल्याने एका डॉक्टरच्या सल्ल्याने परळ येथील टाटा मेमोरिअरल हॉस्पीटलमध्ये तपासणी केली. मार्चमध्ये तिला ओव्हेरियन कॅन्सर म्हणजेच अंंडाशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. हे ऐकून तिचे कुटूंब कोसळले. उपचार सुरू करण्याआधीच २३ मार्चला लॉकडाऊन लागला आणि देवरे कुटूंबिय चिंतीत झाले.

टाटात उपचाराची भीती
लॉकडाऊनच्या काळात स्वप्नाली टाटा मेमोरिअलमध्ये गेली. येथे शक्यता थर्ड स्टेजचे रूग्ण रेफर केले जातात. तेथील गर्दी आणि रूग्णांची अवस्था पाहून ती घाबरली आणि घरी परतली. अन्य ठिकाणी केमो थेरपी, रेडीअेशन शक्य नव्हते. तेवढ्यात एका ओळखीच्याने औरंगाबादच्या हडको एन-१२ येथील सत्युविष्णु हॉस्पीटलचे आयुर्वेदाचार्य डॉ.वाय.जी.पटेल यांची माहिती दिली. डॉक्टरांनी प्रत्यक्ष येणे शक्य नसल्याने व्हिडीओ कॉलवर उपचाराची तयारी दर्शवली.

आयुर्वेदाने कॅन्सर बरा
अंडाशयाचा कर्करोग लवकर लक्षात येत नाही. या रूग्णाच्या स्तनात गाठही होती. लॉकडाऊनमुळे मुंबईत उपचार शक्य नव्हते. ती आमच्याकडे आली आणि आम्हाला उपचाराची संधी मिळाली. आयुर्वेदाने कन्सरसोबतच स्तनातील गाठही बरी झाली. तीन प्रयोगशाळातील अहवालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.-डॉ.आय.जी.पटेल, आयुर्वेदाचार्य, सत्यविष्णू रूग्णालय, औरंगाबाद

दीड वर्षे ऑनलाईन उपचार
डॉ.पटेल यांनी व्हॉट्सअॅपवर कागदपत्रे मागवून घेतले. त्यांची पाहणी केल्यावर स्टेज-२ चा कन्सर असल्याचे समजले. मार्च २०२० च्या अखेरीस आयुर्वेद इम्युनोथेरपी इन कॅन्सर प्रमाणे उपचार सुुरू केले. तोंडावाटे घेण्याची औषधी दिली. दर १५ दिवसाला औषधी बदलून देत गेले. औरंगाबादेत औषधी तयार करून ती कुरिअरने तिला पाठवयाचे. औषधांचा परिणाम जाणून घेण्यासाठी घाटकोपर येथेच तिचे सीटी स्कॅन, रक्तचाचण्या आणि सोनोग्राफीची सोय करून दिली. सुरूवातीच्या तीन महिने दर ३-४ दिवसात कॉल व्हायचा. मग औषधांनी परिणाम दाखविण्यास सुरूवात केल्यावर १०, १५ दिवसात किमान अर्धा तासाचा एक कॉल करायचे.

डॉक्टरांच्या भेटीला रूग्ण
नोव्हेंबरमध्ये स्वप्नालीची सीटी स्कॅन, रक्ताची तपासणी तसेच सीएआरटी चाचणी नॉर्मल आली आणि देवरे कुटूंबाचा आनंद गगनात मावेनसा झाला. आजवर ऑनलाईन दिसलेल्या डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून आभार मानण्यासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले. डॉक्टरांनी परत एकदा औरंगाबादच्या २ प्रयोगशाळेत चाचण्या करून कन्सर बरा झाल्यावर शिक्कामोर्तब केले.

नवीन आयुष्य मिळाले
कर्करोग झाल्याचे रिपोर्ट आले आणि लगेच लाॅकडाऊन लागल्याने आम्ही खूप चिंतीत झालो होतो. डॉ.पटेल यांची माहिती मिळाली आणि त्यांनी दीड वर्षे व्हिडीओ कॉलवर उपचार केले. जगण्याची आशा सोडून दिली असतांना त्यांच्या उपचाराने कॅन्सर बरा झाला आणि नवीन आयुष्य मिळाले.-स्वप्नाली देवरे, रूग्ण, मुंबई

Related Articles

Close