Visit Our Website
Special Story

औरंगाबादच्या भावसिंगपुऱ्यातील ४०० वर्षे जुन्या सत्येश्वर महादेव मंदीरात शिव-पार्वती विरूद्ध दिशेला विराजमान

सरदार भावसिंग यांनी बांधले मंदीर, मोजक्याच मंदीरात असतात शिव-पार्वती विरूद्ध दिशेला

हिंदू धर्मात भगवान शंकर आणि देवी पार्वती या जोडीला आदर्श मानले जाते. यामुळे प्रत्येक मंदीरात शिव-पार्वती शेजारी शेजारी असतात. पण औरंगाबाद शहरातील जुना भावसिंगपुरा परिसरातील श्री सत्येश्वर शिवपार्वती मंदीरात शिव आणि पार्वती विरूद्ध दिशेला, वेगवेगळ्या ठिकाणी विराजमान आहेत. ४०० वर्षे जुने हे मंदीर ऐतिहासीक दृष्ट्या महत्वपूर्ण असून श्रावणात येथे महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळते.

औरंगाबादमध्ये महादेवाची अनेक मंदीर आहेत. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी होते. पण या मंदीरांमध्ये जुन्या भावसिंगपुऱ्यातील प्राचीन श्री.सत्येश्वर शिवपार्वती मंदीर आपले वेगळेपण जपून आहे. शहरापासून दूर, एका कोपऱ्यात असल्याने बहुतांशी भाविकांना त्याची माहिती नाही.

मंदीराला ४०० वर्षांचा इतिहास

सत्येश्वर महादेव मंदीराला ४०० वर्षांचा इतिहास असल्याचे इतिहासतज्ञ सांगतात. निझामांच्या सैन्यातील सरदार भावसिंग यांच्याकडे या भागाची जबाबदारी होती. त्यांच्या नावावरूनच या परिसराचे नाव भावसिंगपुरा पडले. त्यांनी या भागात सैनिकांची छावणी उभारली होती. सैनिकांना दर्शनाचा लाभा घेता यावा यासाठी त्यांनी या मंदीराची उभारणी केल्याचे या भागातील नागरीक सांगतात. परंतू काही नागरीक हे मंदीर त्यापेक्षाही जुने असल्याचा दावा करतात. इतिहासाचे गाढे अभ्यासक दिवंगत डॉ.ब्रम्हानंद देशपांडे यांनीही हे मंदीर खुप प्राचीन काळातील असण्याची शक्यता व्यक्त करतांनाच मंदीरावर सखोल संशोधनाची गरज वर्तवली होती. ४०० वर्षांचा इतिहास जरी गृहित धरला तरी मंदीराचा ताबा राज्य किंवा केंद्रिय पुरातत्व खात्याने घ्यायला हवा होता. परंतू हे मंदीर दोन्हीपैकी कोणाच्याच ताब्यात नाही. यामुळे हे दुर्लक्षीत राहिले. यावर संशोधन होऊ शकलेले नाही.

शंकर-पार्वती समोरासमोर

महादेवाच्या मंदीरात शंकर-पार्वती शेजारी असतात. परंतू या ठिकाणी महादेवाच्या अगदी विरूद्ध दिशेला पार्वती देवी उभी आहे. देशभारात २ ते ३ मंदीरातच शिव-पार्वती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, असे ग्रामस्थ सांगतात. मंदीराचा परिसर अत्यंत नयनरम्य आहे. श्रावणात तर इथले सौंदर्य अधिकच बहरते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर २०-२५ पायऱ्या आहेत. त्या उतरल्यावर शिव आणि पार्वतीची समोरासमोर मंदीरे आहेत. पूर्वी महादेवाची पिंड दगडाची होती. काही वर्षांपूर्वी भाविकांनी यावर पंचधातूंचे आवरण चढवले आहे. पार्वतीची मूर्ती अत्यंत सुंदर आहे. आणखी पुढे येथे ३० फुट खोल आणि ५० फुट रूंद असा एक बारव आहे. याच्या एका बाजूने सुमारे ५० फुट उँच भिंत असून त्यावर हत्ती मोट खेचून आडातून पाणी खेचायचे. या पाण्याने परिसरातील नागरीकांची तहान भागायची. भिंतीवरच हनुमानाची छोटी मूर्ती आहे.

ऐतिहासीक  ठेव्याची पडझड

पूर्वी मंदीराच्या ४ ते ५ एकराच्या परिसराला गुलाबी भिंतीची तटबंदी होती. ४ दरवाजातून आत प्रवेश मिळत. पण आता ही तटबंदी नामशेष झाली आहे. एकच दरवाजा मंदीराच्या समृद्धतेची साक्ष देत डौलात उभा आहे. जवळच अष्टकोनी छत्री असून तेथे अष्टविनायकाचे मंदीर आहे. याची स्थितीही फार समाधकारक नाही. काही दानशूर भक्तांच्या सहकार्याने मंदीरात फर्शी, मजबूत पायऱ्या बसवण्यात आल्या आहेत. पण मंदीरापर्यंत पोहचण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात तर अक्षरश: चिखलातून वाट तुडवत येथे पोहचावे लागते.

महादेव-पार्वतीचा विवाह

मंदीरात वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. श्रावणी सोमवारी येथे यात्रेचे स्वरूप येते.  महाशिवरात्रीला मंदीराची आकर्षक सजावट केली जाते. दिवसभर ऊँ नमो शिवायचा जप चालतो. तर रात्री १२ वाजता महादेव-पार्वतीचा थाटात विवाह लावला जातो. यासाठी दोन्ही बाजूचे वराती येथे येतात. खऱ्याखुऱ्या विवाहासारखाच हा विवाह संपन्न होतो.

देशपांडे आजींची समाधी

या भागात राहणाऱ्या ताराबाई देशपांडे या शिवभक्त होत्या. त्यांनी तब्बल ५० वर्षे नित्यनियमाने या मंदीरात सेवा केली. त्या दररोज मातीचे १०८ शिवलिंगे तयार करून ती इथल्या आडात विसर्जीत करायच्या. त्या मंदीरात पूजा अर्चना करायच्या. त्यांची समाधी या मंदीरातच्या परिसरातच आहे.

नारायण नागबळी करता येतात

हिंदू मान्यतेप्रमाणे एखाद्यावर सातत्याने संकटे येत असतील तर नारायण नागबळीची पूजा करून विघ्न दूर करता येतात. यासाठी त्र्यंबकेश्वर, काशी विश्वेश्वर या ठिकाणी •भाविक जातात. या ठिकाणांवरच हे विधी करता येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. परंतू सत्येश्वर मंदीरातही या विधींना मान्यता आहे. मात्र, ही माहिती खूपच कमी लोकांना असल्यामुळे येथे फारसे लोक येत नाहीत, असे नागरीक सांगतात.

 सुविधा निर्माण व्हाव्यात

मी लहानपणापासून या मंदीरात येत आहे. इथले महात्म्य मी स्वत: अनु•भवले आहे. शिव-पार्वती वेगळे उभे असणारे हे देशातील मोजक्या मंदीरापैकी एक आहे. शहरापासून दूर असल्याने याची फार माहिती नाही. येथे •भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याची गरज  आहे. – कुणाल पाटील, भाविक

Related Articles

12 thoughts on “औरंगाबादच्या भावसिंगपुऱ्यातील ४०० वर्षे जुन्या सत्येश्वर महादेव मंदीरात शिव-पार्वती विरूद्ध दिशेला विराजमान”

  1. Froom entry and exit doors towards the safes, drawers aand a system of
    proper treating keys, they manage it all ffor you.
    While your fashion and hair style may have changed,
    most schools still use this sort of lock for lockers.
    Charm city is realy a sports town then when you exit, you may miss the
    impression of cheering oon the favorite team. http://www.24-7locksmith.org/

  2. hello there and thank you for your info – I’ve definitely picked up anything new from right here.
    I did however expertise some technical issues using this web site, as I experienced
    to reload the website a lot of times previous to I could get it to
    load properly. I had been wondering if your hosting is OK?
    Not that I’m complaining, but slow loading instances times will sometimes affect your placement in google and can damage your
    high quality score if advertising and marketing with Adwords.
    Anyway I am adding this RSS to my email and could look out for much more of your respective intriguing content.
    Make sure you update this again soon.. https://ecubit.org/index.php?title=User:Bernice25T

  3. There are ways to preclude this rom happening but there
    are sevveral items that hhappen which are
    not preventable. If yyou might be using a difficult time
    maaging your financial situation and paying
    your bills, you might consider obtaining a good bankruptcy lawyer.
    Alll the needed information is provided to the creditors with legal proceedings to meet both you and creditors
    for the situation. http://bankruptcy.lurayduilawyer.com/

  4. This is the most critical good rwason that one could should get any insulation. Finally
    underxtand this essential asprct called durability,
    the specifications of it includes materials, thickness of metals, superiority parts.
    Man discovered the hearth accidentally and somehow
    stumbled on are awaree that the process of burning the
    foodstuff in fire or cooking zinc heightens its taste. http://www.sunrisent.com/ac-maintenance/heating-air-conditioning-repair-gilbert-az

  5. Your lawyer can help you function with your financial issues and help you understand everything better.
    If you happen to be creating a difficult time managing your finances and paying your bills,
    you may want to consider locating a good las vegas bankruptcy
    laywer. So notwithstanding how your corporate bankruptcy turns
    out to be true, employing a bankrruptcy lawyer will be very helpful during true proceedings. http://bankruptcy.lurayduilawyer.com/bankruptcy-attorney-toledo-oh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close