Breaking News
हज यात्रेला नेतो सांगून फसवणूक करणा-या तिस-या आरोपीला अटक.
हज यात्रेला नेतो सांगून फसवणूक करणा-या तिस-या आरोपीला अटक करण्यात आली आहे. समीर कय्युम खान असे आरोपीचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी शुक्रवारी नारेगाव येथून त्याला अटक केली आहे. समीरच्या दोन्ही भावांना या आधी अटक करण्यात आली होती़. चार महिन्यांपूर्वी समीर खान आणि त्याच्या इतर दोन भावांनी शहरातील अनेकांना हज यात्रेसाठी नेतो असे सांगून त्यांच्याकडून १३ लाख रुपय उकळले होते़ या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती़ सदर प्रकरणाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्याकडे सोपविण्यात आली़ शेळके यांनी प्रकरणात आता पर्यंत तिघांना अटक केली आहे़.