Visit Our Website
Breaking News

मेहबूब दरवाजाचे दगड पडण्यास सुरुवात

जून महिन्यातसुद्धा घडली होती अशी दुर्घटना प्रशासनाचे दुर्लक्ष

५२ दरवाज्यांचे शहर असलेल्या औरंगाबादची महती आता प्रशासनाच्या दुर्लक्ष पणामुळे कमी होत आहे. पाणचक्की स्थित असलेल्या मेहबूब दरवाज्याचे दगड आज अचानक पणे दुपारी दीड च्या सुमारास पडले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. परंतु अजून सुद्धा प्रशासन या बाबत मौन बांधून आहे. पावसामुळे भिंतीचा बांधा सैल झाला आणि एक एक करून मोठी मोठी दगड रस्त्यावर दरवाज्यातून पडू लागली. याची माहिती कळताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पाणचक्की येथे धाव घेत वाहतूक मार्गात बदल केला आणि दरवाज्याच्या दुरुस्तीसाठी मनपा आयुक्त यांना तात्काळ पत्र देखील दिले. जून महिन्यात याच दरवाज्याचे लाकडी कवाड तुटले होते. ही घटना प्रशासनाने गांभीर्याने घेतली नव्हती. आता तात्काळ दरवाज्याची दगडुगी करण्याची मागणी स्थानिक नागरिक लावून धरणार असल्याचे समीर पठाण यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close