Visit Our Website
Today's Special

१३ ऑगस्ट – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी.

१३ ऑगस्ट २०१८ दिनविशेष

वार : सोमवार (श्रावणी सोमवार, शिवामूठ : तांदूळ)

शके : १९४०

सुर्योदय : ०६.१९

सुर्यास्त : १९.०८

नक्षत्र : पूर्वा

तिथी : शु.द्वितीया, शु. तृतीया.

१३ ऑगस्ट दिनविशेष

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी.

अहिल्याबाई खंडेराव होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या उपाधीने संबोधले जाते. अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला.” भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती. या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव “देवी अहिल्याबाई विमानतळ” असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास “देवी अहिल्या विश्वविद्यालय” असे नाव देण्यात आले आहे”.
राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.
वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत मालवली.

१३ ऑगस्ट – इतर काही दिनविशेष

१९९१ : कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१८९८ : कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
१९३६ : वैजयंतीमाला बाली ऊर्फ ’वैजयंतीमाला ’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्मदिवस
१९०६ : विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (मृत्यू: ३० आक्टोबर १९९८)
१८९८ : प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते (मृत्यू: १३ जून १९६९)
१८९० : त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ – १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी केलेल्या कवितावाचनाने प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ’बालकवी’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. (मृत्यू: ५ मे १९१८)
१८८८ : जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक (मृत्यू: १४ जून १९४६)१९८८ : गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक
१९८० : पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (जन्म: १२ एप्रिल १९१०)
१९१० : आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्या् ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. १९०७ मधे त्यांना ’ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. ’नोटस ऑफ नर्सिंग’ हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे. (जन्म: १२ मे १८२०)
१९४६ : एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १८६६)
१९३६ : मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close