Visit Our Website
In Short

विभागीय कार्यालया समोर रिपाई चे धरणे आंदोलन.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ची रविवारी (दि. १२) सुभेदारी विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर संविधानाची प्रत जाळून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यात आला. सदरचे कृत्य करणा-यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान वाळुज औद्योगिक परिसरातील कारखान्यात काही समाज कंटकानी तोडफोड केली. या घटनेत कारखान्याचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. तोडफोड करणा-या समाजकंटकांना त्वरीत अटक करण्यात यावी. उद्योगधंदे बंद झाले तर इथल्या तरूणांना रोजगार मिळणार नाही. त्यामुळे रिपाई उद्योजकांच्या पाठींशी असल्याचे रिपाईने म्हटले आहे. यध्या देशात सवर्ण आणि दलितां मध्ये तेढ निर्माण करून या दोन्ही समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न काही समाज कंटक जाणीव पूर्वक करत आहे. त्यामुळे सवर्ण आणि दलित तरूणांनी संयम राखावा असे आवाहन ही या बैठकीत करण्यात आले आहे.

या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी  येत्या २० ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर रिपाईच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला बाबुराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, अरविंद अवसरमल, नागराज गायकवाड, विजय मगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close