Visit Our Website
In Short

क्वालिटी सर्कल फोरमची शनिवारी राज्यस्तरीय परिषद औरंगाबादेत

-१२५ संघाचे ३२५ प्रतिनिधी येणार, क्रिएटिंग व्हॅल्यू टू द सोसायटी विषयावर प्रेझेंटेशन

क्वालिटी सर्कल फोरम आॅफ इंडियाची एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद १८ आॅगस्ट रोजी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ‘क्रिएटिंग व्हॅल्यू टू द सोसायटी’ या विषयावर आधारीत परिषदेत उद्योग जगत आणि समाजातील सुरक्षा, उत्पादकता, टाईम मॅनेजमेंट, मूल्यकपात आदी विषयांवर मंथन होईल. स्पर्धा आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज्यभरातील तज्ञ या विषयांवर आपली मते मांडतील. राज्यातील  उद्योग क्षेत्र, रूग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालयातील तब्बल १२५ संघातील सुमारे ३२५ प्रतिनिधी यात सहभागी होतील.

क्वालिटी सर्कल फोरम आॅफ इंडिया ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत अशासकिय संस्था आहे. भारतात याचे ३३ चॅप्टर असून महाराष्ट्रात औरंगाबादसह मुंबई, पुणे आणि नागपूरला याच्या शाखा आहेत. औरंगाबाद चॅप्टरची सन २००० मध्ये स्थापना झाली असून व्याख्याने, प्रबोधन, कार्यशाळांच्या माध्यमातून उद्योग आणि समाजहितासाठी कार्य करत आहे. या मालिकेत अौरंगाबाद चॅप्टरची १८ वी परिषद १८ ऑगस्ट रोजी जालना रोडवरील हॉटेल अतिथी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अौरंगाबाद चॅप्टरचे अध्यक्ष नितिन किनगावकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. वर्षातून एकदा अशी परिषद आयोजित केली जात असल्याचे ते म्हणाले.

सकाळी ९ ते १० दरम्यान नाव नोंदणी तर लगेच कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. परिषदेत क्रिएटिंग व्हॅल्यू टू द सोसायटी या विषयावर क्वालिटी सर्कल अ‍ॅण्ड अलाईड कंन्सेपट्स ही स्पर्धा होणार आहे. उद्योगातील कर्मचारी, अधिकारी क्वालिटी सर्कल, कायझेन, पोकायोके, लीन कल्चर, फाईव्ह एस, टीपीएम, एसएमईडी या संकल्पनावर आधारीत सांघीक कार्याचे महत्व विषद करणाऱ्या प्रेझेंटेशन सादर देतील. तर या संकल्पानांचा वापर केल्यामुळे उद्योगाची कशा प्रकारे प्रगती झाली याच्या केस स्टडीज मांडतील. यावेळी निबंध, घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धाही घेतल्या जातील. विजेत्यांना बक्षीसे आणि ३९ ट्रॉफी दिल्या जातील. याप्रसंगी नितीन किनगावकर यांच्यासहित उपाध्यक्ष नरेंद्र जोशी, सुनील भूमकर, सचिव मंगलदास चोरघे, कोषाध्यक्ष विलास चेके, अमोल गिरमे, विजय अडलक, सुधीर पाटील आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close