Breaking News

राजे संभाजी मित्र मंडळातर्फे जि प समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन

औरंगाबाद : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी राजे संभाजी मित्र मंडळातर्फे सोमवारी करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले.

अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचा जाणता राजा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांच्या अंतकरणात अविस्मरणीय श्रद्धा सामावलेली आहे. सर्व धर्म समभाव व सर्व जाती धर्माच्या स्त्रियांविषयी दैवततुल्य आदर बाळगण्याचे मूल्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जतन केलेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहराच्या हृदयस्थानी असलेल्या जिल्हा परिषद मुख्य दालना समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा अशी राजे संभाजी मित्र मंडळ, यांची प्रास्ताविक कल्पना आहे. निवेदनकांनी विषयात प्रस्तावित केलेली जागा मंजूर करून घेण्याचा हेतू असा की, आज जि.प. औरंगाबाद. महानगराच्या विस्तारीत रचनेनुसार जिल्हा परिषद कार्यालय हा शहराच्या हृदयस्थानी (मध्यभागी) आहे. जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेश करताना मुख्य दालनासमोर प्रथम दर्शनी आगमन करणाऱ्याला शिवाजी महाराजांच्या दर्शनी पुतळ्याची प्राचीन इतिहासाची आठवण व्हावी तसेच एवढ्या मोठ्या जिल्हा परिषदेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत व सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षतेचे मुर्तीमंत प्रतिक असे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी परेश झिरपे, गिरीश गायकवाड, सन्नी लाहोट, अजय चावरीय, नितीन मेघावाले, पांडुरंग पाटील राजेश कसुरे, योगेश जोशी, विकास सूर्यवंशी, विपुल भारूका, सचिन वाहुळकर, शेखर जाधव, मंदिप राजपूत, पराग कुंडलवाल, समीर देवकर, विक्रांत नागोरी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Close